रील्सचा नाद लई बेकार, सिलेंडरवर चढून ठुमके मारले ‘झाले टांगा पलटी घोडे फरार’

Viral Video: सोशल मीडियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, सोशल मीडियाचे जेवढे फायदे आणि तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे रील्स, गाणी, डान्स आणि इतर काही व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात.

सोशल मीडियावर फेमस झाल्यावर लोक लाखो पैसे कमावतात. त्यामुळे अनेकांना पैसे कमावण्याचा हा खूप सोपा मार्ग वाटतो. त्यामुळे हल्ली प्रत्येकालाच सोशल मीडियावर फेमस व्हायचे आहे; त्यासाठी लोक कोणत्याही थराला जाताना दिसतात. त्यासाठी ते अतरंगी व्हिडीओ बनवतात. स्वतःचं हसं करुन घेतात. काहीजण तर या रील्सच्या नादात जीवघेणे स्टंट देखील करतात. अनेकदा त्यांच्या या कृतीमुळे लोक त्यांना ट्रोलही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक डान्स व्हिडिओ वायरल युजर्स म्हणाले..

 

सोशल मीडियावरील व्ह्यूज आणि लाइक्सच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण तरीही लोक स्वतःला जास्तीत जास्त फेमस करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी अनेक भयानक व्हिडीओ बनवताना दिसतात. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये देखील एक महिला चक्क सिलेंडरवर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या घरातील सिलेंडरवर उभी आहे आणि त्यावर ती डान्स करत आहे. ती काही वेळ डान्स करते पण व्हिडीओच्या शेवटी ती जोरात खाली पडते. सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले होते.

 

पाहा व्हिडीओ –

 

 

हा व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) वरील @PalsSkit नावाच्या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलंय की, ‘रील्स आणि मेंढ्यांची चाल यात काही फरक नाही. येथे सिलेंडरवरून पडण्याचा ट्रेंड आहे.’ या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. शिवाय अनेकजण यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, ‘रील्स बनवली तर दात पुन्हा ठीक होतील.’ आणखी एका युजरने लिहिलंय की, ‘भारतात मेंढी चालण्याचा ट्रेंड आहे.’ तर तिसऱ्या यूजरने लिहिलंय की, ‘हा ट्रेंड झाला आहे.’ आणखी एका युजरने लिहिलंय की, ‘हल्ली हे काय पाहावे लागत आहे देवा’

 

वर्गातला तुफान वायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले पहा.

 

Home

Leave a Comment