शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सुरुवातीला शेतकरी पोर्टल वर जाऊन नाव नोंदणी करावी लागेल, शेतकरी पोर्टल ची अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे. त्यासाठी मोबाईल नंबर नाव आधार नंबर टाकून नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेसाठी अर्ज सादर करता येईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
1) लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड
2) सातबारा उतारा
3) आठ- अ उतारा
4) आधार लिंक मोबाईल नंबर
नोंदणी करण्यासाठी –
शेतकरी पोर्टलची लिंक खाली दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही स्वतः नोंदणी करू शकता. अथवा जवळील सीएससी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन देखील तुम्ही नोंदणी करू शकता.