Gharkul Yojana 2023 22 जिल्ह्यांची जिल्हा निहाय यादी आणि किती घरकुले मिळणारशासन निर्णय मध्ये 22 जिल्ह्यांची यादी आली आहे. यामध्ये नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना घरकुल्य मिळणार आहे.
2023-24 वर्षासाठीचा अपेक्षित लक्षांक
नाशिक जिल्ह्यासाठी 8000
अहमदनगर जिल्ह्यासाठी 2000
ठाणे जिल्ह्यासाठी 2000
पालघर जिल्ह्यासाठी 4222
रायगड, सिंधुदुर्ग, आणि रत्नागिरीसाठी 2641
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांसाठी 1884
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 225
जळगाव जिल्ह्यासाठी 5000
नंदुरबार जिल्ह्यासाठी 24000
धुळे जिल्ह्यासाठी 5709
नांदेड जिल्ह्यासाठी 3000
हिंगोली, परभणी जिल्ह्यासाठी 6000
अमरावती जिल्ह्यासाठी 7906
अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी 2800
यवतमाळ जिल्ह्यासाठी 4500
छञपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड जिल्ह्यासाठी 7545
नागपूर जिल्ह्यासाठी 5000
वर्धा जिल्ह्यासाठी 500
गोंदिया जिल्ह्यासाठी 1500
भंडारा जिल्ह्यासाठी 1226
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 866
गडचिरोली जिल्ह्यासाठी 2775
असे एकूण 1 लाख 7 हजार 99 घरकुल ही लाभार्थ्यांना मिळणार आहेत.
Gharkul Yojana 2023 कोणत्या लाभार्थ्यांना ही घरकुल मिळणार आहेत.
👉घरकुल यादीत नाव येथे वेबसाईट पहा
Gharkul Yojana 2023 याबाबत शासन निर्णय जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे.
आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात.
असे अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.
या योजनेअंतर्गत 2023-24 वर्षांमध्ये ग्रामीणसाठी एकूण 1 लाख 7 हजार 99 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शबरी घरकुल योजनेअंतर्गत 2023-24 साठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत.
त्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 2 जून 2023 रोजी निर्गमित केला आहे.