फसवणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द करण्यासाठी त्यासाठी सुरुवातीला त्या सर्व खरेदी दस्ताचे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुम्हाला कोर्टामध्ये जो खरेदी दस्त फसवणुकीने झाला आहे त्या संदर्भात वकिलामार्फत कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल यासाठी चला तर पाहू जाणून घेऊया
दाव्याची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे
Land Record Fraud कलम 31 अन्वये फक्त खरीदस्तच नव्हे तर इतर सर्वच दस्त जे की नोंदणीकृत झालेले असते.
त्या सर्वच दस्तांना रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला असतो.
कलम 31 मध्ये पुढे असेही नमूद केलेले आहे की ज्यावेळेस दिवाणी न्यायालय एखादा असा दस्त रद्द करतात त्यावेळेस त्या निकालाची म्हणजेच विक्रीची एक प्रत सब रजिस्टर ऑफिसला देखील पाठवतात.
जेणेकरून त्यांनी देखील त्यांचे रेकॉर्ड ला ती नोंद घ्यावयाचे असते की तो दस्त रद्द केला गेला आहे.
कलम 32 अन्वये दस्तक काही अंशी म्हणजेच दस्त रद्द करण्याचा अधिकार कोर्टाला असतो.
जर दोन भाऊ आहेत आणि एखाद्या मिळकती मधील काही भागाची विक्री केलेली आहे
तर अशा परिस्थितीत त्या भावाच्या हिस्सापुरताच तो दस्त रद्द होऊ शकतो.
कलम 33 जर कोर्टाने एखादा दस्त रद्द ठरवला आणि त्या दस्ताच्या मोबदल्याची रक्कम वादीला आधीच मिळाले असेल
तर ती दक्कम प्रतिवादीला परत करण्याबाबतचे आदेश कोर्ट करू शकतात.
वादीने जमीन विक्रीसाठी प्रतिवादीकडून तीस लाख रुपये स्वीकारले असतील आणि कोर्टाने तो 30 लाखाचा दस्तश रद्द केला असेल Land Record Fraud
तर अशा परिस्थितीत वादीने प्रतिवादीला 30 लाख रुपये परत करण्याचे आदेश कलम 33 अन्वय कोर्ट देऊ शकतात.
आता असा एखादा दस्त जो की रद्द करायचा आहे त्यासाठी आपणाला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल.
कारण दस्त रद्द करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे.
दावा दाखल करताना त्याबरोबर योग्य त्या किमतीचा कोर्ट फीस स्टॅम्प द्यावा लागतो.
कोर्टी स्टॅम्प दिल्यानंतर दावा कोर्टात दाखल होतो दावा कोर्टात दाखल झाला की प्रतिवादींना नोटीस काढली जाते.
नोटीस मध्ये नमूद तारखेला प्रतिवादीने वादीच्या दाव्यास म्हणणे द्यायचचे आहे.
प्रतिवादींचे म्हणणे आल्यानंतर कोर्ट प्रतिवादींचे म्हणणे आणि वादीचा दावा पाहून मुद्दे काढतात.
अशा मुद्द्याच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादीने पुरावे द्यायचे असतात.
त्यांचा पुरावा संपला की दोन्ही वकील साहेबांचा युक्तिवाद होतो.
नंतर तुमच्या दाव्याचा निकाल होतो.
सर्वसाधारण हा दाव्याचा निकाल दोन ते तीन वर्षात होतो.
Land Record Fraud दावा दाखल करतांना वेळेचे बंधन असते का?
लिमिटेशन ॲक्ट मध्ये म्हणजेच मदतीच्या कायद्यामध्ये असे सांगितले आहे.
ज्यावेळेस वादीस दस्त झाल्याबाबत प्रथम ज्ञान होते तेव्हापासून तीन वर्षाच्या आत हा दावा दाखल करता येतो.