वाटपपत्राच्या आधारे जमिनीचे वाटप :
वाटपपत्राच्या आधारे जमिनीची वाटप तेव्हाच होते जेव्हा सर्व हिस्सेदाराचे एकमत होत असते. या पद्धतीने जमीन वाटपासंदर्भात सर्व हिस्सेदारांचे हिस्से एकमेकांच्या सामंजस्याने ठरतात. यात सर्वांच्या सहमतीने प्रत्येकाच्या क्षेत्राच्या चतुसीमा ठरतात. ह्यात वाटप पत्राचा दस्त रजिस्टर ऑफिसला नोंदवला जातो. या दस्तामध्ये मात्र जमिनीच्या चतुसीमा नोंदणे आवश्यक असते. Land record
महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार :
महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता 1966 नुसार जमीन वाटपासाठी देखील सर्व हिस्सेदारांची सहमती आवश्यक असते. या प्रकारच्या वाटपामध्ये सर्व हीस्सेदारांची सहमती असल्यास तहसीलदार महोदय यांच्याकडे अर्ज करावा लागतो. तहसीलदार महोदय मात्र हा अर्ज सर्व हिस्सेदाराची सहमती असली तरच स्वीकारतात. सर्व हिस्सेदारांना यासाठी तहसीलदारांसमोर अर्जात नमूद वाटपाप्रमाणे आम्ही वाटपास तयार आहोत असे सांगावे लागते.
दिवाणी दावा :
जेव्हा जमिनीची वाटणी सर्व हिस्सेदारांच्या सहमतीने होत नाही तेव्हा दिवाणी दाव्याच्या माध्यमातून ही वाटणी केली जाते. ही प्रक्रिया मात्र वेळखाऊ असते. जेव्हा जमिनीमधील सर्व हिस्सेदाराच्या सहमतीने वाटप होत नाही तेव्हा कोर्टात यासाठी दावा केला जातो. यामध्ये जो सहहिस्सेदार वाटपास नकार देत असतो त्याला प्रतिवादी बनवले जाते. यामध्ये वादी आणि प्रतिवादी यांना उत्तर द्यायचे असते तसेच पुरावे दाखल करायचे असतात. यानंतर मग कोर्ट यावर निर्णय घेते. ही एक क्लिष्ट आणि कायदेशीर प्रक्रिया आहे.