घरबसल्या आयुष्मान कार्ड काढा मोबाईलवर?

घरबसल्या मोबाईलवरून आयुष्मान कार्ड कसे बनवायचे? Ayushman card

– सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. (https://pmjay.gov.in/ ) किंवा तुम्ही अॅप डाउनलोड करून त्यावरूनही प्रक्रिया करू शकता.

– यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.

– होम पेजवर तुम्हाला आयुष्मान कार्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि व्हेरिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.

– ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर संमती फॉर्म उघडेल.

– तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायावर खूण करावी लागेल आणि Allow पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला Authentic च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– आता पुढील पानावर लाभार्थ्याशी संबंधित माहिती आणि फोटो तुमच्यासमोर उघडेल.

– यानंतर, तुम्हाला कॅप्चर फोटोच्या खाली दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून लाभार्थीचा फोटो कॅप्चर करावा लागेल आणि Proceed पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– यानंतर तुम्हाला इतर माहिती टाकावी लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– 80 टक्क्यांहून अधिक फोटो जुळल्यास आयुष्मान कार्ड तुमच्या समोर येईल.

– त्यानंतर तुम्ही ओके ऑप्शनवर क्लिक करून आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
हे कार्ड काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख सांगितली जात आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींनी लवकर हे कार्ड प्राप्त करून घ्यावे.

योजनेबाबात ठळक मुद्दे –
आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5.5 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे.
◆25 कोटी लोकांनी हे कार्ड बनवून घेतले आहे.
●देशभरात 27000 सुचीबद्ध रुग्णालये आहेत त्याची यादी तुम्हाला गुगलवर मिळेल.
◆रेशन कार्डवर जेवढी नावे असतील ते सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत.

आयुष्मान कार्ड घरबसल्या काढण्यासाठी येथे क्लिक करा