Bajaj Chetak Urban बजाजने भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Bajaj Chetak Urbane’ लाँच केले आहे. कंपनीने लोकप्रिय चेतक हा ब्रँड पुन्हा नव्या दमाने बाजारात उतरवला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे हे लेटेस्ट मॉडल आहे. यामध्ये तुम्हाला फीचर आणि रेंज मिळेल. यापूर्वीच्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा यामध्ये बदल दिसले.
इलेक्ट्रिक टू व्हीलरने या इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरिएंट Standard आणि Tecpac सह बाजारात उतरवले आहे. या स्कूटरचा बेसिक मॉडेल प्रीमियमच्या अगदी जवळपास आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये काही बदल केले आहेत. तर काही अपेक्षित बदल केले नाहीत.
चेतकची ब्रेकिंग
Bajaj Chetak Urbane: बॅटरी आणि रेंज
चेतकच्या नवीन मॉडेलमध्ये 2.88 kWh बॅटरी पॅकची पॉवर ताकद देण्यात आली आहे. Chetak Premium मध्ये पण इतकीच बॅटरी देण्यात आली आहे. नवीन बजाज चेतकची रेंज वाढली आहे. आता फुल चार्जमध्ये चेतक स्कूटर 113 किलोमीटरचे अंतर कापेल. तर दुसरीकडे सिंगल चार्जमध्ये प्रीमियम व्हर्जनची रेंज 108 किलोमीटर आहे.
असा आहे टॉप स्पीड
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत काय
Chetak Urbane च्या स्टँडर्ड इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुम किंमत 1,15,001 रुपये आहे. तर Tecpac व्हेरिएंटसाठी 1,12,001 रुपये अशी एक्स शोरुम किंमत आहे. बजाज चेतकच्या प्रीमियम व्हर्जनची एक्स शोरुम किंमत 1,15,000 रुपये आहे.