Pradhanmantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास, घरकुल योजनेच्या याद्या प्रसिद्ध बघा

PMAY: प्रधानमंत्री आवास योजना,घरकुल योजनेच्या याद्या कशा पाहायच्या वाचा संपूर्ण माहिती.
 
नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर ती योजना हे सर्वांना परिचित असलेली प्रधानमंत्री आवास योजना शहराच्या PMAY ठिकाणी किंवा ग्रामीण भागात योजना चांगल्या प्रकारे राबविली जाते याचा लाभ नेमकं कोण घेऊ शकतो याच्या अनेक नियम व अटी आहेत या विषयी आपण चर्चा करणार आहोत गाव ग्रामपंचायत मध्ये बहुतांशी लोकांना याद्या बघायला भेटत नाहीत आणि आपल्याला आता त्या याद्या कशा बघायचा ते पण आपण पाहणार आहोत बहुतांशी ठिकाणी गावात नागरिकांना याद्या पाहायला मिळत नाही ते आज या लेखात आपण कोणत्याही गावातील घरकुल याद्या कशा पाहायच्या ते पाहणार आहोत, शेवटी खाली अधिकृत वेबसाईट लिंक दिली आहे त्यावर देखील तुम्ही पाहू शकता.

घरकुल याद्या येथे पाहा

 
गावचा पाहिलं तर प्रथम नागरिक हा सरपंच असतो आणि ग्रामपंचायत चे काम म्हणजे वरील स्तर सर्व पंचायत समिती असते त्यामुळे सर्व कामे यामार्फत देखील चालतात आणि अशीच पंचायत समितीच्या कामे पाहण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत एक माणूस नेमलेला असतो तो म्हणजे रोजगार सेवक आणि या रोजगार सेवक ग्रामपंचायतीची मनरेगा अंतर्गत मग तुमचे ते शेततळे असो घरकुल असो गावातील रस्ते नाल्या इतरही काही कामे गावातील इतर काही कामे जी की ग्रामपंचायत पंचायत समिती मार्फत चालतात यामधील दुवा म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंच आणि नंतर रोजगार सेवक असतो बहुतांशी लोक आपल्याला माहिती नसतं घरकुल कोणाला दिले कोणाला नाही आपण रोजगार सेवकाकडून याद्या मागून घेऊ शकतो किंवा आपले नाव आहे की नाही त्याच्याकडून माहिती करून घेऊ शकतो अथवा तिथे तुम्हाला माहिती मिळाली नाही तर ते माहिती कशी काढायची आपल्या सरपंचाने घरकुल कोणाकोणाला दिली त्यामध्ये कोण कोण लोक आहेत? खरंच त्यांना घरकुलाची गरज आहे का? pmay
 
घरकुल खरंच गरजवंताला जात आहेत का? आपल्याला गरज असल्यास आपले नाव का नाही? या विषयी आपण माहिती जाणून घेऊ शकता अगर त्यामध्ये काही जर भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही त्या विषयी यांची तक्रार ही देखील करू शकता. तर पाहूया घरकुल यादी कशी बघायची तुम्हाला खालील वेबसाईट लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुमच्या गावच्या घरकुल यादी पाहू शकता. 
 
 
 
PMAY सुरुवातीला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये गुगल क्रोम ओपन करायचे आहे त्यामध्ये पी एम ए वाय Pmay टाईप करायचे आहे तुमच्या समोर वेगवेगळ्या वेबसाईट येतील त्यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना असलेली अधिकृत वेबसाईट उघडायचे आहे वेबसाईटच्या होमपेजवर तेथे गेल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत सुरुवातीला तिथे तुमचं राज्य निवडायचे आहे नंतर तुमचा जिल्हा विचारला जाईल तुमचा जिल्हा निवडायचे आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तालुक्यातील सर्व गावांची नावे तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुमचं गाव निवडायचे आहे आणि तिथे तुम्हाला सबमिटवर टॅब करायचे पुढे तुम्हाला पुढे दोन ऑप्शन येतील डाउनलोड एक्स-एमेल फाईल किंवा डाऊनलोड पीडीएफ तर तुम्ही या दोन्ही याद्या पैकी कोणतीही यादी डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून पाहू शकता तर अशाप्रकारे तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जायचे असेल तर खाली अधिकृत वेबसाईट लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमच्या गावची शहराची घरकुल यादी पाहू शकता.
 
 
 
अधिकृत वेबसाईट ग्रामीण :- https://iay.nic.in/netiay/home.aspx
 
अधिकृत वेबसाईट शहरी :-  https://pmaymis.gov.in/

Leave a Comment