अर्ज कसा भरावा
तहसील कार्यालयाच्या ठिकाणी गावाचे नाव लिहा.
अर्जाच्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम 143 अन्वये शेत रस्त्यासाठी अर्ज.
अर्जाचा विषय लिहा की शेतात येणे जाण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळणे बाबत.
हा अर्ज लेखी स्वरूपात दिला तरी सुद्धा देखील चालेल.
अर्जदारच्या ठिकाणी स्वतःच नाव टाका.
अर्जदाराच्या जमिनीचा तपशील याठिकाणी जमिनीचा संपूर्ण तपशील टाकून घ्या.
त्यामधे गट नंबर, क्षेत्र, हेक्टर, आर. आकारणी, रुपयामध्ये ही सर्व माहिती लिहा.
खाली अर्जदाराच्या शेता शेजारील शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता यामधे पूर्वे, पश्चिम, उत्तर, दक्षिणेला कोणते शेतकरी आहे त्यांची चतु:र्सिमा माहिती लिहा.
महोदय मध्ये गट नंबर सोबत कीती फूट रुंदीचा रस्ता पाहिजे आहे ते लिहा.
आपला विश्वासूच्या ठिकाणी अर्जदाराची सही करा.
शेतरस्त्यासाठी या गावांना मिळाली मंजुरी यादी जाहीर यादीत नाव पहा
अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे
Shet Rasta Kayda अर्जदाराच्या शेत जमिनीच्या व लगतच्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा.
अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सातबारा.
लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते, आणि त्यांच्या जमिनीचे तपशील.
शेजारील जमिनीचे सातबारे. satbara online
अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती.
अर्जदाराच्या शेतजमिनीच्या शासकीय मोजणी नकाशा.
Shet Rasta Kayda अर्ज पद्धत
Shet Rasta Kayda अर्ज पूर्ण करूनहा अर्ज तहसीलदार यांना तहसील कार्यालयात दाखल करा द्या.