व्हर्टिकल प्रॉपर्टी राइटचा नवा नियम. vertical property rights

घराच्या मालकी हक्काचा पुरावा – व्हर्टिकल प्रॉपर्टी राइटचा नवा नियम. vertical property rights

आपल्याकडे जमिनीसाठी सातबारा किंवा मालमत्तेसाठीचे प्रॉपर्टी कार्ड आहे. मात्र शहरी भागात जिथे अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहेत. शेतीप्रमाणे संबंधीत फ्लॅटच्या ओनरशीपला दुजोरा देणारी यंत्रणा नाही. सध्या विकसकासोबत झालेली खरेदी- विक्रीचा करार हा ओनरशीपसाठी ग्राह्य समजला जातो.

मात्र आता व्हर्टिकल प्रॉपर्टी राईट नियमातंर्गत प्रत्येक सोसायटी अपार्टमेंट मधील फ्लॅट ओनर्सनात्यांच्या घराच्या मालकी हक्काचा पुरावा देता येईल, अशा आशयाची यंत्रणा विकसित केली जाते आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

तसेच या संबंधीत योजनेची यंत्रणा ही स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे राबविण्यात येईल असे सांगितले जाते आहे. यात घर, पार्किंग व संबंधीत फ्लॅटधारकाच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टींचा मालकी हक्काचा विचार त्यात केला जाणार आहे. त्यावर लवकर निर्णय होईल अशी आशा आहे.

सुरुवातीला रेरा RERA रजिस्टर्ड म्हणजे रेरा कायद्यान्वये नोंद असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये प्रकल्पांची नोंदणी व त्यांना मालकी हक्काचा उतारा देण्याचे काम केले जाईल नंतर उर्वरित प्रॉपर्टी व प्रकल्पांबद्दल हीकार्यवाही होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यांने इतर उर्वरित सोसायटींमधील मालमत्तांच्या नोंदणी काम पूर्ण होवून त्यांना मालकी हक्काचा पुरावा दिला जाणार आहे.

👉नवनवीन अपडेट्स साठी येथे क्लिक करा