शेतजमीन ज्याच्या आजोबा, पंजोबा, वडिलांच्या नावावर आहे, त्यांच्या पश्चात वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो.
वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्यांची सातबारावर नोंद होईल.
👉वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली सुविधा विकसित केली आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, कमी करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे अशा सेवांसाठी अर्ज करता येतो. आणि आपण केलेल्या
अर्जावरील कार्यवाही कुठपर्यंत आली, अर्जाची स्थिती देखील तपासता येते. दरम्यान, तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर १७ व्या दिवशी तो मंडळधिकारी यांच्याकडे जातो. १८ व्या दिवशी नोंद करणे किंवा काही तफावत कमी असल्यास रद्द होतो. त्यासंबंधीचा अधिकार मंडळधिकाऱ्यांना आहे.