हे शेतकरी असतील पात्र
• लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
• महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये.
• दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
• दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
• लाभधारकाच्या 712 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
• लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
• एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
• ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
• 7/12 चा ऑनलाईन उतारा
• 8 अ चा ऑनलाईन उतारा
• जॉबकार्ड ची प्रत
• सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
• सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.
👉👉शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा