‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? 3000रु अनेक लाभ अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या

Mukhyamantri Vayoshri Yojana: ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ही राज्य सरकारने वयोवृद्धांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमार्फत ६५ वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांना आर्थिक मदत दिली जाते.

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक ते साहित्य दिले जाणार असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा केले जातात.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड / मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स कॉपी
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • स्वयं घोषणापत्र
  • ओळखपत्र पटविण्यासाठी शासकीय मान्यता असलेली इतर कागदपत्रे

 

Sarpanch Salary: सरपंच व उपसरपंच यांना पगारवाढ किती मानधन मिळतं? जाणून घ्या

 

योजनेचे स्वरूप :

पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता / दुर्बलतेनुसार खाली दिलेली आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करता येणार आहे.

योजनेअंतर्गत मिळणारी उपकरणे

  • चष्मा
  • श्रवणयंत्र
  • ट्रायपॉड स्टीक
  • व्हील चेअर
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची,
  • नि- ब्रेस,
  • सर्वायकल कॉलर

 

‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या

 

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता

  • या योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत.
  • ३१ डिसेंबर २०२३ रोजी ज्यांचे वय ६५ किंवा त्या पेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • राज्यातील किमान ३० टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.
  • अर्जदाराने मागील तीन वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून या योजनेत मिळणारे उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण / अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.

 

पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाईन अन् ऑफलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

 

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी अर्ज कसा करायचा?

सध्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज ऑफलाइन सादर करावा लागले. अर्ज करण्यासाठी अर्जदारांना समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सादर करावा लागेल.

 

अधिक माहितीसाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ

 

Home

Leave a Comment