Kangana Ranaut : जवानाने खासदाराच्या लगावली कानशिलात, कंगनाने व्हिडीओ पोस्ट..

Kangana Ranaut : CISF महिला जवानाने कशामुळे कानशिलात लगावली, कंगनाने व्हिडीओ पोस्ट करत सविस्तर सांगितलं!

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला सीआयएसएफची महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली होती.

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला सीआयएसएफची महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली होती. चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. आता कंगना रणौतने या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.सीआयएसएफच्या महिला जवानाने कशामुळे कानशिलात लगावली? याबाबतही कंगनाने सविस्तर सांगितलं आहे.

 

काय म्हणाली कंगना राणौत ?

नमस्कार मित्रांनो, मला फार फोन कॉल येत आहेत. शुभचिंतक आणि मीडियातील लोक माझ्यासी संपर्क करत आहेत. सर्वांत पहिल्यांदा सांगते की, मी सुरक्षित आहेत. आज जो प्रसंग  झाला.  तो सेक्युरिटी चेक जवळ झाला. मी तिथून जात असताना दुसऱ्या कॅबिनमधील एक महिला होती जी सीआयएसएफची सुरक्षा कर्मचारी होती. तिने मला क्रॉस करण्याची वाट पाहिली. त्यानंतर ती माझ्यासमोर आली आणि माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर मला ती शिव्या देखील देत होती. मी तिला विचारले की, तिनं असं का केलं? तेव्हा तिने सांगितलं की, मी शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करते. मला आता पंजाबमध्ये वाढणाऱ्या आंतकवादाबद्दल चिंता वाटू लागली आहे.

 

व्हिडीओ पहा 👇

 

 

 

कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Rnaut) हिमाचल प्रदेशातील मंडीतून  (Mandi Loksabha) विजयी झाली आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली आहे. कंगनाची मंडीतून संसदेत ग्रँड एन्ट्री झाल्याने सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाने घोषणा केली होती,”निवडणूक जिंकले तर बॉलिवूड सोडून देईन”. त्यामुळे आता ‘पंगाक्वीन’ मंडीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करत राजकारणातच स्वत:ला झोकून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं आहे. त्यामुळे आता ती बॉलिवूडचं मैदान सोडणार का? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.

 

Home

Leave a Comment