Shivrajyabhishek Din 2024 : ढगांमध्ये तयार झाली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, AI निर्मित फोटो व्हायरल

Shivrajyabhishek Din 2024 : ढगांमध्ये तयार झालेली दिसतेय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, AI निर्मित फोटो व्हायरल, एकदा पाहाच

सोशल मीडियावर महाराजांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर प्रेम व्यक्त करतात. सध्या असाच एक फोटो समोर आला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे

Viral Photo : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाचा आदर्श आहेत. त्यांचे विचार प्रत्येक मराठी व्यक्ती आत्मसात करताना दिसतो. महाराजांचे गडकिल्ले त्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहे. अनेक शिवप्रेमी महाराजांना मानवंदना देण्यासाठी गडकिल्ल्यांना भेट देतात. सोशल मीडियावर महाराजांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर प्रेम व्यक्त करतात. सध्या असाच एक फोटो समोर आला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला चक्क ढगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसत आहे. फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. (Shivrajyabhishek Din 2024)

व्हायरल होतोय फोटो

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे. महाराजांच्या विचारांवर चालून महाराष्ट्र पुढे नेण्याचं स्वप्न प्रत्येक जण बघतो. शिवप्रेमी महाराजांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतो. सध्या एआयच्या जगात अनेक नवनवीन गोष्टी दिसून येतात. एआय निर्मित महाराजांची ही अनोखी प्रतिमा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला आकाश दिसेल. या आकाशात ढग दिसत आहेत. तुम्ही ढगांना नीट पाहाल तर तुम्हाला या ढगांमध्ये एक प्रतिमा दिसून येईल. ही प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. हा फोटो पाहून कोणीही थक्क होईल. अतिशय स्पष्टपणे महाराजांची प्रतिमा दिसून येत आहे.

व्हायरल फोटो पहा

 

shivaji_maharaj_history या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे. हर हर महादेव” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ तुमच्या पोस्ट तर खूप भारी आहे कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्ट टाकतात” तर एका युजरने लिहिलेय,”खूप गरज आहे तुमची आम्हाला महाराज” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा फोटो AI टूल पासून बनवला आहे पण काय फरक पडतो, आपले राजे सगळीकडे आहेत.” अनेकांना हा फोटो आवडला असून अनेक युजर्सनी ‘जय शिवराय’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे लिहीत कमेंट बॉक्समध्ये जयघोष केला आहे.

 

Home 🏠

Leave a Comment