“सुप्रिया ताईंनी मने जिंकली’ गाडीतुन उतरून मुलींसोबत काढला सेल्फी साधेपणा!

सुप्रिया ताईंचा साधेपणा व्हिडीओ होतोय वायरल

Supriya Sule Viral Video : लोकसभा निवडणूक २०२४ चा ४ जून रोजी निकाल जाहीर झाला. देशासह राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. राज्यात भाजपाला चांगलाच फटका बसला तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाला.

ठाकरे गट शिवसेना आणि शदर पवार गटाने लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. शरद पवार यांच्या लेक सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या निवडणुकीत सुद्धा मोठ्या आकडेवारीने विजय मिळवला. सध्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे या मुलींबरोबर सेल्फी काढण्यासाठी थेट गाडीतून उतरतात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सुप्रिया सुळे या त्यांच्या गाडीतून जात होत्या. अचानक त्यांना गाडीच्या खिडकीबाहेर एक तरुणी आणि तिच्याबरोबर एका चिमुकलीला स्कुटीवरून नेताना दिसते. या तरुणीला सु्द्धा सुप्रिया सुळे दिसतात. तेव्हा ती तरुणी सु्प्रिया सुळेंबरोबर बोलते. तिच्याबरोबर गाडीवर बसलेल्या चिमुकलीला ‘या सुप्रिया ताई’ असे सांगत सुप्रिया सुळे यांची ओळख करून देते. त्यानंतर तरुणी सुप्रिया ताईला ‘फोटो काढू का ताई’ असे विचारते त्यावर सुप्रिया सुळे हो म्हणतात. जेव्हा तरुणी सेल्फी काढते तेव्हा सुप्रिया सुळे स्वत: गाडीतून उतरतात आणि मुलींबरोबर सेल्फी काढतात. हा व्हिडीओ सिग्नलवरील असल्याचा दिसून येत आहे. सुप्रिया सुळेंच्या या साधेपणाचे अनेक जण कौतुक करत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ जूना आहे जो आता निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा व्हायरल होत आहे. Viral Video

 

पाहा व्हिडीओ

 

 

ncp_youth_speaks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘नातं आपुलकीचं, नातं विश्वासाचं !!’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘ताई फोटो साठी खाली उतरून आलात. त्यात मन जिंकल’ तर एका युजरने लिहिलेय, ‘राजकारण बाजूला ठेवून विचार केला तर ताईने मन जिंकले.’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘मुलींनी आदर्श घ्यायला पाहीजे ताईनकडून’ एक युजर लिहितो, ‘आपली ताई सुप्रिया ताई….याला म्हणतात संस्कार..’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी सुप्रिया सुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.’

 

Home

Leave a Comment