पावसात रस्त्यावर एवढं पाणी की तरूण वाहून जाताना! Video Viral

Monsoon alert यावर्षी पावसाने चांगला प्रतिसाद दिला आहे पावसातील काही व्हिडिओ देखील समोर आले आहे. त्यातच सध्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.

Pune Rain Update News : असंच पुण्यात पावसाच्या व्हायरल व्हिडिओंमध्ये एका तरुण पाण्यात वाहून गेल्याचं दिसत आहे. हा तरुण आपल्या दुचाकीवर बसलेला असताना दुचाकी सकट वाहून गेल्याचं दिसत आहे. काल सलग तीन तास पाऊस पडल्याने रस्त्यावर मोठं पाणी साचलं होतं. हे पाणी इतकं होतं की रत्यावर नदी वाहतेय की काय असं चित्र दिसत होतं.

 

व्हिडिओ पहा –

 

 

त्यात एक दुचाकीस्वार रस्त्याने जात होता. पाणी जास्त असल्याने तो हाताने दुचाकी ढकलत नेत होता. तितक्यात त्याची दुचाकी स्लिप झाली आणि पाण्यातील प्रवाहासह पुढे वाहू लागली. दुचाकी वाहुन जाऊनये म्हणून तो देखील दुचाकी धरून राहिला. मात्र हा व्यक्ती देखील पाण्यात वाहून चालला आहे, असं चित्र व्हिडिओत दिसत आहे. पद्मावती भागात ही घटना घडलीये.

 

पुण्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचे असणार आहेत. पुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा वेध शाळेचा अंदाज आहे.

 

पुण्यात आज आणि उद्या शहरात संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसू शकतो. काल देखील संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. राज्यात मुंबईसह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुणे वेधशाळेकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

Home

Leave a Comment