‘यारा ‘तेरी यारी को’ सिंहाला म्हशीने शिंगाने उडवले, नेटकरी म्हणाले मित्र असावा तर असा

Viral Video: सोशल मीडियामुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात; ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात.

तर, काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक व्हाल.

एकट्या व्यक्तीला पाहिले की, अनेक लोक त्या व्यक्तीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्या व्यक्तीला त्रास देतात. पण, जेव्हा आपल्यासोबत खूप जण उभे असतात तेव्हा शत्रू कितीही मोठा असला तरीही तो पळून जातो. अशीच घटना या व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, या ठिकाणी सिंहाचा एक शावक म्हशीच्या पिल्लावर हल्ला करीत असल्याचे दिसत आहे. पण अचानक पुढे असे काही होते, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

हा व्हिडीओ एका जंगलातील असून, तिथल्या एका रस्त्याच्या कडेला बसलेल्या म्हशीच्या पिल्लावर सिंहाच्या शावकाने हल्ला केल्याचे दिसत आहे. म्हशीच्या पिल्लावर होणारा हल्ला पाहून म्हशीचा कळप धावत येतो आणि त्यातील एक म्हैस सिंहाच्या शावकाला तिच्या शिंगावर उचलून दूर फेकते. दोन-तीन वेळा ती म्हैस शावकाला शिंगावर घेऊन पुन्हा खाली फेकते. त्यानंतर सिंहाचा तो शावक दूरवर पळून जातो. म्हशीच्या पिल्लाच्या एकटेपणाचा गैरफायदा घेणाऱ्या शावकाला म्हैस चांगलीच अद्दल घडवते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pro_capitalmotivation07 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर युजर्सकडून आतापर्यंत अनेक लाइक्स व कमेंट्स करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला सहा मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

 

 

या व्हिडीओवर नेटकरीदेखील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलेय, ‘सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवल्यावर कोणीही आपल्या वाट्याला जाणार नाही.’ आणखी एकाने लिहिलेय, ‘मित्राच्या आनंदात कधी आमंत्रणाशिवाय जाऊ नये; पण संकटात मात्र त्याने हाक मारली नाही तरी जावे. तोच खरा मित्र…’ आणखी एकाने लिहिलेय, ‘काय खतरनाक व्हिडीओ आहे. एकदम जबरदस्त.’ आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, ‘कायम सोबत असणाऱ्या मित्रांना सलाम.’

Home

Leave a Comment