विहिरीतून येत होते विचित्र आवाज; गावकऱ्यांनी केली गर्दी आत डोकावताच उडाला थरकाप!

Viral News: समाजामध्ये अनेक घटना घडत असतात वृत्तपत्रात अनेकदा आपण वाचत असतो आणि आई होणं ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. मातृत्वाचं सुख प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक स्त्री स्वतःला पूर्ण समजते, असं म्हटलं जातं. नऊ महिने पोटात ठेवून ती एका जीवाला या जगात आणते.

त्यानंतर ती त्याची काळजी घेते. पण त्या कलियुग मातेला काय म्हणावं जिने लिंग पाहूनच आपल्या बाळाला विहिरीत टाकलं.

पूर्वी म्हणायचे की मूल क्रूर पुत्र होऊ शकेल, पण आई कधीच क्रूर माता होत नसते. म्हणजे आई आपल्या मुलाचं कधीही नुकसान करू शकत नाही. पण आजच्या जगाने ही म्हण चुकीची सिद्ध केली आहे. आजकाल अशी प्रकरणं पाहायला मिळतात जिथे आई आपल्या नवजात मुलाचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. असाच एक प्रकार फारुखाबाद येथून समोर आला आहे.

सर्व गावाची राशन यादी जाहीर येथे पहा ऑनलाईन एका क्लिकवर

हे प्रकरण फारुखाबादमधील मोहम्मदाबाद भागातील मॉडेल शंकरपूर गावाशी संबंधित आहे. येथे काही गावकऱ्यांना विहिरीतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला, त्यांना प्रथम वाटलं की कदाचित काही गैरसमज झाला असेल. पण विहिरीत डोकावल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. आत एक नवजात बाळ पडलेलं होतं. विहीर दहा फूट खोल होती. आत जास्त पाणी नव्हतं, त्यामुळे बाळ बुडालं नाही. मात्र एवढ्या उंचीवरून फेकल्यामुळे बाळाला दुखापत झाली होती.

गावकऱ्यांनी बाळाला पाहताच सर्वजण तेथे जमा झाले. एका व्यक्तीने लगेच दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. गळ्यात टॉवेल गुंडाळून तो खाली उतरला. बाळाला त्याच टॉवेलमध्ये बांधून तो माणूस बाहेर आला. बाहेर लोकांनी बाळाला चांगलं पुसलं आणि नंतर लोहिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मुलगी झाल्याने आईनेच तिला विहिरीत टाकलं असावं, असं सांगितलं जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

हिरोईन फिकी शिक्षकेचा विद्यार्थ्यासोबत भन्नाट डान्स व्हिडिओ वायरल

 

Home

Leave a Comment