RTE Admission : ‘आरटीई’ इंग्रजी शाळा मोफत प्रवेशाची आज शेवट!

RTE News : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी १६ मे पासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रक्रियेअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मे होती.

परंतु अर्ज करण्यास शासनाने ४ जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान १ जून च्या दुपार पर्यंत चार हजार ७३४ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले. परंतु प्रवेशासाठी केवळ दोन हजार १४ जागा राखीव असल्याने अर्ज अधिक व जागा कमी असल्याचे दिसून येते.

समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.

दरम्यान यंदा शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशाच्या प्रक्रियेला तब्‍बल दोन महिने विलंबाने प्रारंभ झाला. त्यासोबतच प्रवेशाचे निकष सुद्धा बदलवण्यात आले. त्याचा परिणाम आरटीई प्रवेशावर सुद्धा दिसून आला.

त्यामुळेच यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास सुरू झाल्यानंतर केवळ ७४६ पालकांनीच त्यांच्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन दाखल केले होते. शासनाच्या अटीविरोधात न्यायालयाने निर्णय देत सदर अट रद्द केली. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. परंतु १७ मे पासून जुन्याच पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता अर्ज करण्यास ४ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यानंतर मुदतवाढ नाही!

ज्या खासगी विनाअनुदानित शाळांच्या एक किमी परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा आहेत, त्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गतच्या ‘२५ टक्के आरटीई’ प्रवेशांच्या बंधनातून सूट देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे रोजी स्थगिती दिली. न्यायालयाचा हा निकाल पालकांसाठी दिलासादायक ठरला. त्यानंतर नव्याने जुन्या पद्धतीने आरटीईची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. दरम्यान अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याने आता लॉटरीची तारीख कधी जाहीर होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी आहे जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा – नोंदणीकृत शाळा -रिक्त जागा- प्राप्त अर्ज

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Home

Leave a Comment