व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओ येथे पाहा
पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायलादेखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ सोशल मीडियावरील @kushal_m.j या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास १४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून सात लाखांहून अधिल लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शाळेचे मुख्याध्यापक कॅमेऱ्यातून पाहत असतील”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “लकी विद्यार्थी, लकी शिक्षिका”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “माझी शाळा अशी का नाही.” तर एका युजरने लिहिलंय की, “आमच्यावेळी अशा शिक्षिका नव्हत्या.” तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “आमचे हे स्वप्न आता स्वप्नच राहणार.”