जलसंपदा विभागांतर्गत गट – क मधील रिक्त पदांच्या 4,075 जागेवर महाभरती ! शासन निर्णय GR पहा !
जलसंपदा विभाग अंतर्गत गट – क मधील रिक्त पदे भरण्याकरीता प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करणेबाबत , राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडुन दि.17-11-2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . जलसंपदा विभागातील 4075 जागेवर भरती प्रक्रिया बाबत निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात.
👉जलसंपदा पदभरती शासन निर्णय पहा
👉 येथे क्लिक करा 👈👈
शासन सेवेत रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागातील आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नसल्यामुळे सरळसेवेच्या कोट्यातील 80 टक्के पदे भरण्याबाबतची कार्यवाही दि.15-08-2023 पुर्वी करण्यात येणार आहे. जलसंपदा विभाग अंतर्गत काही मंडळांच्या कार्यक्षेत्रामध्ये 2-3 जिल्हे तर काही मंडळाच्य कार्यक्षेत्रामध्ये संपुर्ण राज्यातील बहुतांश जिल्हे येत असल्यामुळे प्रादेशिक स्तरावरील गट क मधील नामनिर्देशनाने भरावयाच्या पदावरील नियुक्तीसाठी उमदेवाराची निवड करण्याकरीता परिमंडळनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
1985 सालापासून चे खरेदीखत येथे पहा ऑनलाईन
जलसंपदा विभागातील मुख्य अभियंत्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गट – क मधील नामनिर्देशनाने रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भांकित शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार तसेच सेवा प्रवेश नियम , सर्व प्रकारचे आरक्षण इ.संबंधी प्रचलित नियम व आदेश विचारात घेवून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही त्वरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .यामध्ये वर्ग – क संवर्गातील 80 टक्के पदे भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
जलसंपदा विभागामध्ये एकुण 4075 जागा रिक्त
जलसंपदा विभागामध्ये सध्या एकुण 4075 जागा रिक्त असून , जलसंपदा विभागाचा वरील नमुद शासन निर्णयान्वये 4075 जागेच्या 80 टक्के जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . याकरीता संबंधित विभागाकडुन रिक्त पदांचा आकृत्तीबंधाची माहीती सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत .
जलसंपदा विभागाचा भरती प्रक्रिया संबंधित दि.17-11–2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.