Sugarcane Registration: ऊसाची नोंदणी कुठल्याही कारखान्याला करा आता घरबसल्या, साखर आयुक्तालयाकडून ॲपची निर्मिती

Sugarcane Registration: आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी कुठल्याही कारखान्याला, शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची नोंदणी कारखान्यांकडे करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. महत्वाची अपडेट- साखर आयुक्तालयानं अशा एका ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज घरबसल्या आता आपल्या उसाची नोंदणी करता येणार आहे.

👉ऊस नोंदणी ॲप डाऊनलोड (App download) करण्यासाठी👉यावर क्लिक करा👈

Sugarcane News : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane Farmers) एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची नोंदणी कारखान्यांकडे करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयानं एका ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता आपल्या उसाची नोंदणी करता येणार आहे. ‘महा-ऊस नोंदणी’ (Maha-US Nondani) ॲप असे या ॲपचे नाव आहे.

सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ॲपचे उद्घाटन

सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या ‘महा-ऊस नोंदणी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, संचालक अर्थ यशवंत गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. या ॲपमध्ये ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव तसेच गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊस क्षेत्राची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊसाची नोंदणीसाठी कळवायचे आहे यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येईल. या ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील सहकारी आणि खासगी अशी एकूण 200 कारखान्यांकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकणार आहे.

👉ऊस नोंदणी ॲप डाऊनलोड (App download) करण्यासाठी👉यावर क्लिक करा👈

महा-ऊस नोंदणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता आपल्या मोबाईलवर आपल्या उसाची नोंदणी करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन उसाची नोंदणी करण शक्य नाही अशा शेतकऱ्यांना स्वत:च्या मोबाईलवरुन नोंदणी करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यात जाऊन ऊस क्षेत्राची नोंदणी केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती देखील या ॲपमध्ये दिसणार आहे.

मोबाईल ॲप वापरण्याबाबत सूचना

सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअर मधून अथवा आम्ही खालील दिलेल्या लिंकवरून ‘महा-ऊस नोंदणी’ (Maha-US Nondani) हे ॲप डाउनलोड करुन घ्यावे. त्यानंतर QR Code आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करून Google Play Store वरती जाऊ शकता. ॲप इंस्टॉल करा त्यानंतर आपल्या ऊस  क्षेत्राची माहिती भरा. यामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार नंबर, आपलं नाव भरावे. त्यानंतर ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा आहे, त्याचे नाव लिहावे. असे तीन कारखाने निवडावे. त्यानंतर आपल्याला धन्यवाद असा संदेश येईल. त्यानंतर आपण निवडलेले कारखाने आपल्याशी संपर्क साधतील अशा सोप्या पध्दतीने ऊस उत्पादक शेतकऱ्याला यशस्वी रित्या घरबसल्या कुठल्याही कारखान्याला ऊसाची  नोंदणी करता येईल..

👉ऊस नोंदणी ॲप डाऊनलोड (App download) करण्यासाठी👉यावर क्लिक करा

Leave a Comment