Crop insurance: कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक झाले बारा कोटी जमा; पहा यादी

Crop insurance : बीड जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बजाज अलायन्झ या विमा कंपनीने प्राधिकृत केलेल्या बँकेकडून १२ कोटी रुपये चुकून जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जवळपास १० हजार रुपये जमा झाल्याने मोठा आनंद झाला. मात्र हा आनंद औट घटकेचा ठरणार आहे. crop insurance pdf

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक खात्यावर चुकून पैसे पडले तर ते परत घेण्यासाठी संबंधित बँकांना विशिष्ट अधिकार आहेत. त्यामुळे १२ हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीचे १२ कोटी परत घेण्यासाठी जिल्ह्यातील ११ बँकांना विमा कंपनीने पत्र लिहिले आहे. त्यानुसार वसुलीची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कसे केले जातील शेतकऱ्यांकडून पैसे वसूल?

रब्बी व खरीप हंगामातील पीक विम्यासाठी बजाज अलायन्झ ही कंपनी शासनाने ज्या १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चुकून पैसे जमा झाले आहेत त्या खातेदारांची संपूर्ण नावे, खाते क्रमांक, रक्कम संबंधित बँकेला कळविण्यात येत आहे. त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर जेवढी रक्कम जमा झाली आहे तेवढीच रक्कम गोठवली जाईल. types of crop insurance

उदा. जर शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा झाले असतील तर १० हजार रुपये गोठवले अर्थात होल्ड केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यास ती रक्कम काढता येत नाही.

जर शेतकऱ्याने जमा झालेले १० हजार रुपये खात्यावरून काढले असेल तर भविष्यात संबंधिताच्या बँक खात्यावर जेवढी रक्कम जमा होईल तेवढी रक्कम शेतकऱ्यास काढता येणार नाही.

उदा. ४ हजार जमा झाले तर ती रक्कम शेतकऱ्यास काढता येणार नाही. पुढील ६ हजार रुपये जमा होईपर्यंत खाते होल्ड राहते. अशा प्रकारे वसुली केली जाणार आहे. १० हजार रुपये जमा झाले ती रक्कम बँक खात्यावरुन कपात होईल. types of crop insurance

पीक विम्याचा व या रकमेचा संबंध नाही

पीक विमा रक्कम खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया बजाज अलायन्झ कंपनीकडून सुरु आहे. आता १२ कोटी रुपये वसूल होत नाहीत तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम जमा होत नाही तोपर्यंत पुढील विमा रक्कम जमा होणार नसल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले. crop insurance pdf

Leave a Comment