दहावी-बारावी चा निकाल यादिवशी बोर्डने दिली माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE Board result) शुक्रवारी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (State Board result) दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये लागली आहे.

विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांनी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल उशिरा लागणार का अशी चर्चा होती. (State Board result) मात्र राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यातच तर दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

👉10वी 12वी निकाल कधी लागणार तारीख येथे पहा

राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. 2 ते 25 मार्च या कालावधीत पेपर झाले होते. दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. या परीक्षेत 14 लाख विद्यार्थी होते.

👉CBSE 10th Result 2023 Announced : दहावीचा निकाल जाहीर, ऑनलाईन इथे चेक करा

बारावीचा निकाल 31 मे पूर्वी लागू शकतो तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं की, बोर्डाच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. यातील बारावीचे निकाल 31 मे पूर्वी आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचा परिणाम निकाला वर होईल का? राज्यातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिकांवर बहिष्कार टाकला होता.

त्यामुळे निकाल कधी लागणार? निकालावर याचा परिणाम होणार का? असे प्रश्न निर्माण झाले होते. याशिवाय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीही संप पुकारण्यात आला होता. यामुळे अनेक शैक्षणिक कामे झाली नव्हती. पण या संपाचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर झालेला नाही. आता सीबीएसईने निकाल जाहीर केल्यानंतर राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या निकालाची चर्चा होत आहे.

👉या तारखेला लागणार 10वी,12वी चा निकाल येथे पहा

Leave a Comment