रेशन कार्ड धारकांकडे हे कागदपत्र असेल तरच मिळणार रेशन

Ration card update: रेशन कार्ड धारकांकडे हे कागदपत्र असेल तरच मिळणार रेशन

Ration card new rules : रेशनकार्ड काढण्यासाठी अगोदर केवळ आधारकार्ड असले तरी निभावून जायच. आता मात्र यासाठी कागदपत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामध्ये जन्मदाखला अनिवार्य केला असून, जातीचा दाखला व शैक्षणिक कागदपत्रेही द्यावी लागणार आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी आता आठ ते दहा प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

अशा नवीन सरकारी योजना व नोकर विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

याआधी केवळ आधारकार्ड असले तरी रेशनकार्ड मिळायचे. आता मात्र रेशनकार्डसाठी कागदपत्रे गोळा करताना धावपळ करावी लागणार आहे. दरम्यान, नवीन कार्ड मिळाले तरी त्याची ऑनलाइन नोंद घ्यावी लागते. त्याशिवाय रेशनचा लाभ मिळत नाही. वाढती लोकसंख्या, विभक्त कुटुंबपद्धती यामुळे रेशनकार्डच्या मागणीत वाढ होत आहे. काहीवेळा तांत्रिक अडचणींमुळे रेशनकार्डची ऑनलाइनला नोंद होण्यास विलंब लागतो.

राशन कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी अशी आहे प्रक्रिया

आता ही कागदपत्रे आवश्यक :-

नवीन रेशनकार्डसाठी शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, वीज बिल व इतर माहिती मागिवण्यात आली आहे. त्याशिवाय रेशनकार्ड मिळत नाही.

रेशनमध्ये नवीन नाव समाविष्ट?

घरात कुटुंबसंख्या कमी अधिक झाल्यास त्याची नोंद ऑनलाईन रेशन कार्डवर घ्यावी लागते.

नवीन नाव समाविष्ट केल्यास लाभार्थी संख्येनुसार मिळणाच्या धान्याचा लाभही घेता येतो. त्यासाठी नवीन सदस्याची कागदपत्रे देऊन नाव समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे.

आता काही वाढीव कागदपत्रे गरजेची :-

रेशनकार्डसाठी पूर्वी लागणाऱ्या कागदपत्रांसोबत आता काही वाढीव कागदपत्रे देणे गरजेचे आहे. त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यास रेशनकार्ड मंजूर केले जाते. रेशनकार्डमध्ये नावे कमी-अधिक करणे ही नियमित प्रक्रिया आहे. ration card new rules

येथे तुमचे रेशनकार्ड डाउनलोड करा मोबाईलवर येथे क्लिक करा

Leave a Comment