Pm swanidhi scheme: छोट्या व्यवसायासाठी ७ टक्के व्याजावर लोन, ₹१२०० चा कॅशबॅक;

Pm swanidhi scheme: व्यवसायिकांसाठी केंद्र सरकारने कोरोना काळात पंतप्रधान-स्वनिधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ५० लाखांहून अधिक लोकांना लाभ घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम-स्वनिधी योजनेअंतर्गत ५० लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे.

स्वनिधी योजनेनं छोटे व्यावसायिक, रस्त्यावरील विक्रेत्यांचं जीवन केवळ सोपं केलं नाही तर, त्यांना कठीण परिस्थितीत सन्मानानं जगण्याची संधी दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या महान कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन! पीएम स्वनिधी योजनेने देशभरातील रस्त्यावरील विक्रेत्यांचे, छोट्या व्यावसायिकांचे जीवनमान केवळ सोपंच केलं नाही तर त्यांना सन्मानानं जगण्याची संधीही दिली आहे, याचं मला समाधान आहे, असं ते म्हणाले.

काय आहे योजना?
Pm swanidhi yojana; पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत सुरुवातीला १०००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. वेळेवर पैसे परत केल्यास कर्जाची मर्यादा वाढते. ही कर्जाची रक्कम ५० हजार रुपयांवर गेली आहे. कर्जाची रक्कम डिजिटल पद्धतीने भरल्यास १२०० रुपयांचा चा वार्षिक कॅशबॅकही देण्यात येतो. त्याचा व्याज दर वर्षाला ७ टक्के आहे. या कर्जासाठी कोणत्याही सिक्युरिटीजची आवश्यकता नाही. त्याच वेळी, तुम्ही किमान कागदपत्रांवरदेखील कर्ज घेऊ शकता.

कोरोनामुळे ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला त्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय निधी उपलब्ध करून देणं हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पात्र विक्रेते ओळखण्यासाठी आणि योजनेअंतर्गत नवीन अर्ज गोळा करण्यासाठी राज्ये/युएलबी जबाबदार आहेत.

यामध्ये सरकार तथापि, लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी मंत्रालय अनेक उपक्रम घेत आहे. यात राज्ये/केंद्रशासित प्रदेश/यूएलबी/कर्ज देणार्‍या संस्थांसोबत नियमित आढावा बैठका घेणे, रेडिओ जिंगल्स, दूरचित्रवाणी जाहिराती आणि वृत्तपत्रे यांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये वेळोवेळी जागरुकता मोहीमेचाही समावेश आहे.

स्वनिधी योजना अर्ज व अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा येथे क्लिक करा

Leave a Comment