Petrol Diesel Prices: पेट्रोलच्या किंमती घसरल्या;आजच आपल्या गाडीची टाकी फुल करा पहा सध्याचे दर

Petrol Diesel Price Today: अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने बदल होत असतो. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर करतात. आज WTI क्रूड ऑइल ०.१७ टक्क्यांनी वाढले असून ८९.३८ डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे.

ब्रेंट क्रूड ०.०९ टक्क्यांनी वाढलंय. त्यामुळे ९१ डॉलर प्रति बॅरलवर दर पोहचलेत. (Latest Marathi News)

कच्च्या तेलाच्या किंमतीत दररोज चढ उतार दिसत असले तरी चार प्रमुख महानगरांतील पेट्रोल (Petrol) डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही. गेल्या महिनाभरापासून चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

 1. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
 2. दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
 3. कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 92.76 प्रति लिटरने विकलं जातंय.
 4. चैन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 94.33रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

Petrol Diesel Price Today

 तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर येथे पहा

 

वेगवेगळ्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर आकरल्या जाणाऱ्या टॅक्समुळे दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळतात. आज महाराष्ट्रात काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

 • पुण्यात पेट्रोल 105.84 रुपये आहे. तर डिझेल 92.68 रुपये प्रति लिटरवर पोहचलंय.
 • ठाण्यात पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर आहे.
 • छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल 107.07 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
 • नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर आहे.
 • नागपुरमध्ये पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर.
 • कोल्हापूरात पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर आहे.
 • महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत १ रुपयाने घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.

Petrol Diesel Price Today

 तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर तपासा? पहा

 

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर असे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोट पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.

Home

Leave a Comment