Lightning Notification: वीज कुठे पडणार 15 मिनिटे अगोदर कळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन ॲप

Lightning Notification: वीज कुठे पडणार 15 मिनिटे अगोदर कळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन ॲप 10 ते 15 मिनिटे अगोदर कळणार वीजेचं लोकेशन

नमस्कार मित्रांनो agriculture technology आज आपण आपल्या या महत्वाच्या माहितीसह आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक छानशी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे वीज पडणे काही आपल्यासाठी नवीन नाही आपल्यासाठी आपले शेतकरी मित्र बांधव हे या दिवसांमध्ये शेतीची मशागतीची कामे चालू असतात त्यामुळे ते शेतीमध्ये खुरपणी असो किंवा खत टाकणी असो किंवा कोळपणी असो या प्रकारचे सर्व कामे चालू असतात ही कामे हमेशा शेतकऱ्यांची चालू असतात आणि त्यामध्ये एक सर्वात मोठे संकट म्हणजे वीज पडणे याला अगोदर सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणायचे की या गोष्टीला आपण टाळू शकत नाही पण आता भारत सरकारने यावर एक उपाय शोधून काढला आहे. यासाठी एक ॲप लॉन्च केले आहे हे तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी शेवटी लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही कोणते ॲप आहे त्याचा वापर आणि कसे डाउनलोड करायचे ते डाऊनलोड करू शकतात दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंकवर जा.

ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो पावसाळ्यात वीज पडून जीवितहानी होते त्याचप्रमाणे वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते ही कमी करायच असेल तर केंद्र सरकारने लॉन्च केलेल ॲप आपल्या मोबाईल मध्ये नक्की घ्या, डाउनलोड करायचा सल्ला देखील केंद्र सरकारने दिला कुठे जर वीज पडणार असेल तर या ॲपच्या मदतीने तुम्हाला १५ मिनिटे अगोदर माहिती नोटिफिकेशन द्वारे मिळणार आहे त्यामुळे हे होणारे नुकसान टाळता येऊ शकणार आहे. दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

भारत सरकारच्या पृथ्वी व्यावहार मंत्रालयाच्या कार्यकारणीत येणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे यांनी शेतकरी बांधवांना कुठे जर वीज पडणार असेल तर वीज पडण्यापासून दहा ते पंधरा मिनिटे अगोदर सावध करण्यासाठी दामिनी ॲप लॉन्च केले आहे हे ॲप दहा मिनिटांपूर्वी वीज गडगडाट आणि विजांची एकदम बरोबर माहिती देणार आहे त्यासाठी शास्त्रज्ञांनी देशाच्या विविध भागांमध्ये कमीत कमी 48 सेन्सर्स सह लाईटनिंग लोकेशन नेटवर्क विस्तारित केले आहेत. याद्वारे नक्कीच आपल्याला दामिनी च्या मदतीने जो की 40 किमी परिसरात वीज कुठे पडणार आहे याची एकदम बरोबर माहिती देणार आहे हे नेटवर्क विजांच्या कडकडाटासह वादळाचा वेग सुद्धा तुम्हाला सांगणार आहे.

आणखी पुढे ॲप मध्ये विज कुठे जर पडली तर उपाय योजनाही आणि सुरक्षा उपायांसह प्रथमोपचाराची माहिती पण मिळणार आहे. असे डॉ सिंघानिया यांनी सांगितले आहे. आणि ते म्हणाले की वीज पडणे ही नैसर्गिक हवामानाची परिस्थिती आहे मानव व प्राण्यांसाठी धोकादायक आहे हे थांबवता येऊ शकत तर नाही पण या पासून सावधानता ही नक्कीच आपल्याला या दामिनी ॲप द्वारे मिळणार आहे वादळाचा अंदाज आपल्याला अगोदर कळल्यास जीवित व वित्तहानी टाळता येऊ शकते यासाठी तुम्ही हे ॲप डाऊनलोड करा

ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment