Farmer Scheme: मोठी बातमी कर्जमुक्ती प्रोत्साहन! पात्र शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करा

Farmer Scheme : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा केंद्रावर किंवा बँक शाखेशी संपर्क करून तातडीने संपर्क साधून आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(Farmers Debt Relief Scheme Eligible farmers should do Aadhaar authentication)

या योजनेअंतर्गत नियमीत पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेतलेला आहे.

शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना! पात्र शेतकऱ्यांची जिल्हावाईज यादी पहा

या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार मर्यादेपर्यंत या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड केलेली आहे.

त्यापैकी या योजनेस पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही झालेले नाही. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा केंद्र किंवा बँक शाखेशी तातडीने संपर्क करून आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे नसता आपल्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आधार प्रमाणीकरणा अभावी प्रोत्साहन योजनेच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे.

कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर, गावानुसार याद्या पहा

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेतील राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड केलेली आहे, त्यापैकी पात्र काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, तरच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

मागील 3 वर्षापासून 2018-19-20 चा रखडलेल्या शेतकऱ्यांचा पिकवीमा मिळणार शासन निर्णय.

Leave a Comment