बिअर घेताना वडिलांनी धरलं अन पुढे.., व्हिडिओ पहा

Viral video: कोणताही तरुण जेव्हा दारूच्या दुकानात बिअर किंवा दारू घेण्यासाठी जातो तेव्हा तो इकडे तिकडे पाहत राहतो की त्याच्या ओळखीचे कोणी पाहत आहे का. आजही आपला समाज सार्वजनिक ठिकाणी दारू आणि बिअर पिणे चांगले मानत नाही.

अशा परिस्थितीत, कल्पना करा की तुम्ही दारूच्या दुकानात उभे राहून बिअर खरेदी करत आहात आणि मागून तुमचे वडिल येतात. फक्त विचार करुनच भीती वाटली ना? दरम्यान अशीच घटना एका तरुणासोबत घडलीय.

सोशल मीडियावर तुम्ही अनेक प्रँक व्हिडीओ पाहिले असतील. प्रँक म्हणजे एखाद्याची फिरकी घेणं आणि त्याच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करणं. पण काही वेळेस हे प्रँक अंगाशी सुद्धा येतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एक मुलगा आपल्या वडिलांसोबत प्रँक करत होता. बिअर घेण्यासाठी तो दुकानात गेला त्यानं बिअर घेतली अन् तेवढ्यात त्याच्या वडिलांनी पाहिलं अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. प्रँक करण्याच्या नादात होत्याचं नव्हतं झालं. या तरुणाची अवस्था पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. तरुणाला बिअर घेणे चांगलंच महागात पडलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पुढे जे घडलं जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक वडिल आपल्या मुलाला चप्पलने मारहाण करत आहे. हातात बिअर धरलेला मुलगा म्हणतो, पप्पा, ही माझी नाही. पण काका त्याचे ऐकत नाहीत आणि त्याला चप्पलने मारतात. यानंतर तो मुलगा म्हणतो, पापा, मी शप्पथ सांगतो मित्राने ऑर्डर दिली होती… तुम्ही मला का मारताय… सगळे बघत आहेत… मी पीत नाही ओ. या मुलाच्या वडिलांनी ज्या प्रकारे त्याची धुलाई केली. ते पाहून तु्म्हालाही हसू अनावर होईल.

 

पाहा व्हिडीओ

 

 

 

दरम्यान हा व्हिडीओ peddlermedia या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ८३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शेकडो यूजर्स कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले – वडील आणि मुलगा दोघांनाही सलाम. दुसऱ्याने सांगितले की, हे देसी पिता-पुत्राचे बंधन आहे. तर एका व्यक्तीने पप्पा दारूच्या दुकानात काय करतात असे विचारले. अशा या व्हिडिओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. बरं, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय म्हणणं आहे? कमेंट मध्ये सांगा.

 

Home

Leave a Comment