विजेच्या तारेला स्पर्श झाला अन 20 सेकंदात मृत्युचा थरार सीसीटीव्हीत कैद Viral Video

Viral Video सोशल मीडियावर नेहमीच निरनिराळे व्हिडियोज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला पॉट धरून हसवतात तर काही आश्चर्याचा धक्का देतात तर काही थक्क करून जातात. सध्या असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.

यात चक्क एका व्यक्तीच्या मृत्यूचा थरार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण निशब्ध झाले आहेत.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडलेली आहे. इथे एका तरुणाला विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला आहे. व्हिडिओत दिसते की, घरासमोरील व्हरांड्यात काही लोक फिरत आहेत. काहीसेकंदाने इथे एक व्यक्ती काठी घेऊन येतो आणि या काठीचा वरील विजेच्या तारेला स्पर्श होताच त्या व्यक्तीला जोरदार विजेचा झटका बसतो आणि तो खाली कोसळतो. यानंतर बाकी लोक त्याला बघायला धाव घेतात, त्याचे हात, पाय आणि छाती चोळण्यास सुरुवात करतात मात्र त्याधीच त्याचा मृत्यू झालेला असतो. तरूणाचा मृत्यू 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये लाइव्ह कैद झाला आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. अनेकलोक हे पाहून आवक् झाली आहेत.

 

 व्हिडिओ येथे पहा

 

 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव देवेंद्र असून तो महोबाच्या चांदोन गावातील रहिवासी होता. मात्र यावेळी तो जसोदा नगर येथील चुलत भावाच्या घरी धार्मिक कार्यक्रमात सामील होण्यासाठी गेला होता. घरातील सर्वचजण मंदिरात जाण्याच्या तयारीत असतानाच ही दुःखद घटना घडून आली. देवेंद्रचे वय 35 वर्ष होते. एका निष्काळजीपणामुळे काही सेकंदातच तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आता अनेकजण हा व्हिडिओ पाहून थक्क होत आहेत. निष्काळजीपणा कसा जीवावर बेतू शकतो याचे एक उत्तम उदाहरण तुम्ही या व्हिडिओतून पाहू शकता.

 

व्हिडिओ पाहा येथे क्लिक करा

 

Home

Leave a Comment