Drip Irrigation Subsidy : ठिबक सिंचनासाठी दीड कोटीचे अनुदान जमा शेतकरी येथे यादीत नाव पहा
Agriculture News : ठिबक व तुषार संचासाठी २०२२-२३ या वर्षात अनुदानापासून ९२९ लाभार्थी वंचित राहिले होते. शासनाने वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना चालू वर्षी एक कोटी ६९ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बॅँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
यादीत नाव पहा;अनुदानासाठी येथे करा अर्ज
तरीही काही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांकडून वारंवार अनुदान देण्याची मागणी केली जात होती. त्या वेळी कृषी विभागाने शिल्लक अनुदानाची मागणी केल्यानंतर शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कृषी विभागामार्फत ठिबक व तुषार संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ८० टक्के अनुदान देण्यात येते.