Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ ही 4कागदपत्रं असा करा अर्ज
केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. डीबीटी (Maha DBT Scheme) मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर हवी असलेली योजना निवडून अनेक योजनांचा देखील लाभ घेऊ शकतात.
पाण्याचा अपव्यय होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचना खालील क्षेत्रात वाढ व्हावी, मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर व अवजारे मिळावीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.
लॉटरी काढून लाभार्थी निवड
शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ वेळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच पण प्रत्येक योजना लॉटरी पद्धतीने असल्यामुळे लाभाचा कालावधी वेगवेगळ्या टप्प्यात असू शकतो असे विचारले असता, अनेक लाभार्थ्यांना अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांना सतत देतात.
Maha DBT Scheme लाभार्थींना निश्चितपणे लाभ मिळतोच
शासनाच्या डीबीटी या धोरणामुळे शेतकऱ्यांना एका अर्जावर 14 योजनांचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. एकाच अर्जावर 14 योजनांचा लाभ मिळतो यामध्ये अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्या हव्या असलेल्या योजनांची निवड त्या अर्जात भरताना करावी.
माहिती आवडल्यास इतरांना देखील पाठवा