Crop Insurance: शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास वाढ; केंद्रचा निर्णय!

Crop Insurance केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची मुदत वाढवली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पीकविमा भरता येणार आहे.

राज्य सरकारची मागणी

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज- दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

अर्ज प्रक्रियेत अडचणी

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.

 

पीक विमा अर्ज मोबाईलवर भरण्यासाठी
येथे पहा संपूर्ण प्रक्रिया

 

 

केंद्र सरकारचा निर्णय

त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याचे मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

Home

Leave a Comment