दरम्यान अनेकांच्या माध्यमातून जर एटीएम मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात तर काय केले जाऊ शकते? या फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
अशा परिस्थितीत आज आपण एटीएम मधून फाटलेल्या नोटा निघाल्यास सर्वप्रथम काय करावे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एटीएम मधून फाटलेली नोट निघाल्यास काय करणार?
तुम्ही एटीएम मधून पैसे काढलेत आणि यामध्ये काही फाटलेल्या नोटा निघाल्यात तर तुम्ही त्या नोटा बदलू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार आहे. बँकेत जाऊन फाटलेली नोट सहज बदलून मिळते.
फाटलेल्या नोटा बदलून नवीन नोटा दिल्या जातात. याबाबत आरबीआयने काही नियम तयार केले आहेत. आरबीआयच्या नियमानुसार एटीएम मधून फाटलेल्या नोटा निघाल्यास त्या चेंज करून दिल्या जातात.
बँका तुम्हाला फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दाखवू शकत नाहीत. मात्र फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक अर्ज करावा लागणार आहे.
किती नोटा बदलू शकता