Affordable Car for Family: दुचाकीस्वारांना सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करावा लागतो. उन्हापासून दिलासा देत मान्सूनचे आगमन झाले असले तरी त्यामुळे दुचाकी-स्कूटरचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आज आपण ज्या कारची चर्चा करत आहोत ती एक लिटर पेट्रोलवर २५ किलोमीटर चालते. तुम्ही विचार करत असाल की ही हलकी कार असेल, पण तसे नाही. या कारमध्ये १०००cc इंजिन असून त्यात चार-पाच लोक आरामात फिरू शकतात. या कारने तुम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकता. फीचर्स आणि इतर पॅरामीटर्सच्या बाबतीत ही कार तिच्या किमतीनुसार उत्कृष्ट आहे. यामध्ये दोन एअरबॅगही उपलब्ध आहेत.
हेही वाचा : Tata Safari, XUV 700 नव्हे तर महिंद्राच्या ‘या’ सात सीटर सुरक्षित SUV कारला ग्राहकांची मोठी मागणी, किंमत
Alto K10 ला १.०-लिटर ३-सिलेंडर इंजिन मिळते, जे ६६ bhp चे कमाल पॉवर आउटपुट आणि ८९ Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा AMT गिअरबॉक्सच्या पर्यायासह येते. हेच इंजिन मारुतीच्या सेलेरियोमध्येही दिसत आहे. हे इंधन कार्यक्षम इंजिन पेट्रोलमध्ये २४ किलोमीटर आणि सीएनजीमध्ये ३३ किलोमीटरपर्यंत मायलेज देते.
विशेष बाब म्हणजे, या कारचा ईएमआय मोटरसायकलइतकाच आहे. जर तुम्ही यासाठी १.३५ लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला ३.१५ लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर व्याज दर ९ टक्के असेल आणि कर्जाचा कालावधी सात वर्षांसाठी असेल, तर कारचा हप्ता सुमारे ५ हजार रुपये असेल. इतका हप्ता तुम्ही सहज भरू शकता.
नवीन Maruti Suzuki Alto K10 चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात Std, LXi, VXi आणि VXi+ यांचा समावेश आहे. व्हीएक्सआय मॉडेलसह सीएनजी आवृत्ती खरेदी केली जाऊ शकते. टॉप मॉडेलची किंमत सुमारे ६.६१ लाख रुपये आहे.