Cm Kisan Yojana 2nd instalment:नमो किसान योजनेचे 4 हजार रुपये; “या” तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
नमो किसान योजनेचे 4 हजार रुपये
येथे पहा गावानुसार यादी
परंतु,राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. नमो शेतकरी महा सन्मान या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या शेवटच्या चाचण्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे निधी वाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी अलीकडे दिली आहे . जवळ जवळ 86.60 लाख राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजने मध्ये दर 4 महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत . म्हणजेच वर्षाकाठी ही रक्कम जवळपास 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
Cm Kisan Yojana 2nd instalment
‘नमो-किसान’ या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून जवळ जवळ 6060 कोटी रुपये आपल्या राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत .सरकार कडून सध्या केवळ 4000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे . सॉफ्टवेअरच्या चाचण्या पूर्ण झाल्या नंतर सध्याच्या उपलब्ध असलेल्या चार हजार कोटींच्या निधीतून शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात वितरणास अडचण येणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. तोपर्यंत राज्य सरकार कडून उर्वरित राहिलेले जवळपास 2060 कोटी रुपये मिळू शकतील. आणि त्यातून तिसरा हप्ता शेतकऱ्यांना देता येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.