ATM मधुन फाटलेल्या नोटा निघाल्यास करा हे काम लगेच बदलून मिळतील वाचा

ATM Cash Withdrawal Rule : बँक ग्राहकांसाठी विशेषतः एटीएम वापरणाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर एटीएम मुळे पैशांचे व्यवहार झटपट होत आहेत. आपल्याला केव्हाही आणि कुठेही पैशांची गरज भासली तर आपण आपल्या बँकेतील पैसे एटीएम च्या माध्यमातून लगेचच काढू शकतो.

भारतातील कोणत्याही एटीएम मधून आपल्याला पैसे काढता येतात. मात्र अनेकदा एटीएम मधून फाटलेल्या नोटा निघतात. या फाटलेल्या नोटा कुठेचं स्वीकारल्या जात नाहीत. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

दरम्यान अनेकांच्या माध्यमातून जर एटीएम मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात तर काय केले जाऊ शकते? या फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

अशा परिस्थितीत आज आपण एटीएम मधून फाटलेल्या नोटा निघाल्यास सर्वप्रथम काय करावे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एटीएम मधून फाटलेली नोट निघाल्यास काय करणार?

तुम्ही एटीएम मधून पैसे काढलेत आणि यामध्ये काही फाटलेल्या नोटा निघाल्यात तर तुम्ही त्या नोटा बदलू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार आहे. बँकेत जाऊन फाटलेली नोट सहज बदलून मिळते.

फाटलेल्या नोटा बदलून नवीन नोटा दिल्या जातात. याबाबत आरबीआयने काही नियम तयार केले आहेत. आरबीआयच्या नियमानुसार एटीएम मधून फाटलेल्या नोटा निघाल्यास त्या चेंज करून दिल्या जातात.

बँका तुम्हाला फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दाखवू शकत नाहीत. मात्र फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक अर्ज करावा लागणार आहे.

किती नोटा बदलू शकता

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँकेत अर्ज करावा लागतो. या अर्जात तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ आणि ज्या एटीएममधून पैसे काढले गेले आहेत त्याची माहिती द्यावी लागणार आहे. पण एका वेळी एक व्यक्ती जास्तीत जास्त वीस नोटा बदलू शकतो.

तसेच या नोटांचे मूल्य पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असायला नको. म्हणजेच एक व्यक्ती एकावेळी पाच हजार रुपये मूल्यांच्या 20 फाटलेल्या नोटा चेंज करू शकणार आहे. महत्त्वाचे म्हणजे फाटलेल्या नोटा बदलण्याची ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटात पूर्ण होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Home

Leave a Comment