महागडा फोन याच्यापुढे फिका! आता फक्त 1269रु मध्ये फ्लिप फोन, फिचर्स एक नंबर!

Low price flip mobile सध्या मार्केटमध्ये फ्लिप फोनची क्रेझ वाढत आहे. सॅमसंग, वनप्लस आणि ओप्पोसारख्या मोबाइल फोन उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये फ्लिप फोन लाँच केलेले आहेत. या फ्लिप फोनचे आकार सामान्य आहेत; मात्र या फोनव्यतिरिक्त सध्या मार्केटमध्ये अतिशय लहान आकाराचा एक फ्लिप फोनदेखील उपलब्ध आहे.

लहान मुलांच्या खेळण्यातला वाटावा, इतका त्याचा आकार लहान आहे. या सर्वांत लहान फ्लिप फोनमध्ये अनेक बेसिक फीचर्स आहेत.

या फोनची किंमत इतर सामान्य फोनच्या तुलनेत फार कमी आहे. मीशो या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फक्त 1269 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवरसुद्धा हा फोन 1500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे. शिवाय, या फोनच्या खरेदीवर काही बँक डिस्काउंट ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत.

सर्वांत लहान फ्लिप फोनची फीचर्स
या फोनचा आकार फक्त 4 इंच आहे. तो अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा सेटअपदेखील आहे. यात 10 मेगापिक्सेल क्षमतेचा प्रायमरी कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा मात्र यात उपलब्ध नाही.

हा फोन ड्युएल सिम सपोर्टसह मिळतो. म्हणजेच या छोट्या फोनमध्ये तुम्ही दोन नंबर वापरू शकता. त्यात 2000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. 4G कनेक्टिव्हिटी, 32 GB पर्यंत एक्स्पांडेबल स्टोरेज अशी काही चांगली स्पेसिफिकेशन्स या फोनमध्ये आहेत. या फोनला हेडफोनदेखील कनेक्ट करता येतात. कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे. फोनमध्ये एक वर्षाच्या आत काही समस्या निर्माण झाली तर कंपनी रिप्लेसमेंट आणि रिपेअर सर्व्हिस देत आहे. हा फोन बेसिक वापरासाठी आणि आवड म्हणून चांगला आहे. वापर हेवी असेल आणि बजेटही चांगलं असेल तर तुम्ही चांगला स्मार्टफोन वापरला पाहिजे. सध्या मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे अतिशय चांगले स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीवर चांगला डिस्काउंटदेखील मिळतो.

अधिक माहिती आणि फीचर्स येथे पहा
छोट्या बजेटमध्ये आना आता फोर व्हिलर कार मायलेज आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल!

Home

Leave a Comment