well subsidy: शेतकऱ्यांसाठी खुशखबर मागेल त्याला विहिरीसाठी आता 4लाख अनुदान,महत्त्वाच अटही रद्द
well subsidy : भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशातील जवळपास 65 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती (Agriculture) व्यवसायावर अवलंबून आहे.
मात्र शेती करणं देखील सोपी गोष्ट आहे का? याचमुळे सरकार विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देतं. शेती (Agricultural Subsidy ) करताना सर्वात जास्त गरज असते ती पाण्याची. यामुळे शेतकऱ्यांना (Lifestyle) पाण्याची साठवणूक करण्यासाठी विहीर खोदणे गरजेचे आहे. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात (Financial) आर्थिक भांडवल लागते. म्हणूनच मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरींसाठी अनुदान (Subsidy) दिले जाते. आता यामध्ये मोठा बदल करून अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
👉शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विहीरीच्या अनुदानात वाढ आणि अट रद्द
आता मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर याप्रमाणे अनुदान (Lifestyle) मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे या योजनेची अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी (Department of Agriculture) आता विहिरीसाठी अर्ज करू शकतात. दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. ही अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
शेतकरी पात्रता व आवश्यक कागदपत्रे
Saur Krushi Vahini Yojana : सौर कृषी वाहिनी, शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 75,000 प्रती हेक्टर!
लाभार्थी निवड
• अनुसूचित जाती
• अनुसूचित जमाती
• भटक्या जमाती
• निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
• दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
• स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
• शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
• जमीन सुधारणांचे लाभार्थी
• इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
• अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
• सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)
👉शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे शेतकरी असतील पात्र
• लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
• महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये.
• दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
• दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
• लाभधारकाच्या 712 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
• लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
• एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
• ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
• 7/12 चा ऑनलाईन उतारा
• 8 अ चा ऑनलाईन उतारा
• जॉबकार्ड ची प्रत
• सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
• सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.