PM Kusum Solar : पीएम कुसुम सोलर योजनेसाठी 2.0 टप्पा सुरू कोटा शिल्लक तात्काळ करा अर्ज
शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कृषी क्षेत्रातील सिंचन घटकात यशस्वी ठरलेल्या शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू झालेले आहेत. शेतकऱ्यांना पीएम कुसुम घटक व योजनेसाठी अधिकृत पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
👉सौर कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये
अर्ज सुरू झाल्यासंदर्भात महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकारी यांच्यामार्फत अधिकृत जाहिरात वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या अनुषंगाने तुम्ही कृषी ऊर्जा अभियान कुसुम घटक ब या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. कृषी ऊर्जा अभियान कुसुम घटक ब टप्पा 2 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मे 2023 पासून सुरू झाली आहे. kusum solar yojana
👉कुसुम घटक ब अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
कृषी ऊर्जा अभियान कुसुम घटक ब टप्पा 2 अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचा कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून पुढील दोन दिवस वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता परत एकदा दररोज शिल्लक कोटा दिला जात असून या शिल्लक कोट्यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, जेणेकरून फॉर्म भरल्यानंतर फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी संबंधित विभागाकडून काढण्यात येणार नाही. तुमच्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध असल्यास संपूर्ण माहिती भरून 100 रुपयाची ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करावी लागेल. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती युजरनेम व पासवर्ड पाठविला जाईल. युजरनेम व पासवर्ड च्या मदतीने तुम्ही अर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता.