Animal Husbandry Department : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाची अनेक पदे सध्या रिक्त असल्याने पशुपालकांना तसेच शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी गैरसोय निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
👉सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मागील वर्षी लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता जाणवली होती. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्री विखे पाटील यांनी आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर करण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात मेगा भरती केली जाणार आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची ०३ पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत.
यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री यांनी दिली.