Pm kisan 18th installment: ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता; त्याआधी ‘हे’ काम करा!

पीएम किसान 18वा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा 18 वा हप्ता; त्याआधी ‘हे’ काम कराच!

Pm kisan 18th installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

हा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो. यापूर्वी जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 वा हप्ता जारी केला होता. पंतप्रधान मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील 9.26 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 17 वा हप्ता म्हणून 21,000 कोटींहून अधिक रक्कम जारी केली होती. तर यापुर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये 16 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता.

योजनेचे फायदे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये, म्हणजे वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. ही योजना 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती. ही आता जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनली आहे.

ई-केवायसी आवश्यक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. किंवा मग बायोमेट्रिक ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो.

लाभार्थी हप्त्याची स्थिती येथे तपासा

लाभार्थ्यांना अशी तपासता येईल स्थिती
– pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– Know Your Status वर क्लिक करा.
– तुमचा नोंदणी क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि Get Data पर्याय निवडा.
– तुमची स्थिती दिसेल

लाभार्थी यादीतील नाव तपासा
– पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.pmkisan.gov.in.
– Beneficiary list वर क्लिक करा.
-राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
– Get report वर क्लिक करा.
– त्यानंतर लाभार्थी यादी दिसेल.
– अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 155261 आणि 011-24300606 वर संपर्क साधा.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा
– pmkisan.gov.in वर जा.
– New Farmer Registration’ वर क्लिक करा आणि आधार क्रमांक टाका.

यादीत नाव पाहा

Home

Leave a Comment