Government Schemes: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज लाभ कसा घ्यावा पाहा

Government Schemes : प्रधानमंत्री उज्वला योजनेचे (Pradhan Mantri Ujjwala Yojana)मुख्य उद्दिष्ट हे देशातील गरीब स्त्रियांना अशुद्ध इंधन सोडून स्वच्छ एलपीजी इंधनाला (LPG fuel)प्रोत्साहन देणे आणि गरीब महिलांच्या आरोग्यावर धुरामुळे होणारे परिणाम यांपासून त्यांचे रक्षण करणे हे आहे.

तसेच यामुळे पर्यावरणाला (environment)दूषित होण्यापासून देखील वाचवले जाईल.

देशातील गरीब कुटुंबातील महिलांना लाकूड एकत्र करून त्या लाकडांवर रोजचे अन्न शिजवावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात लाकूड ओले असल्यामुळे त्या महिलांना अन्न शिजवताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच त्या लाकडांपासून होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अमलात आणली गेली आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅसच्या वापरामुळे महिलांचे आणि लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येईल आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देखील देण्यात येईल. या सर्व उद्दिष्टांचा विचार करून प्रधानमंत्री उज्वला योजना देशात राबवली जात आहे.

योजनेचे लाभ कोण घेऊ शकतो?
– मागासवर्गीय कुटुंब बेटावर राहणारे लोक
– दारिद्र रेषेखालील आणि लोकअंत्योदय योजनेत समाविष्ट असणारे लोक
– प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबातील लोक

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभ कोणते?
– या योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखाली येणाऱ्या महिलांना म्हणजेच एपीएल आणि बीपीएल शिधापत्रिका असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
– एका महिन्यात एक मोफत सिलेंडर देण्यात येईल. पहिल्या-दुसऱ्या हप्त्याची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जाईल. त्यानंतर तिसरा हप्ता दिला जाईल. दुसऱ्या सिलेंडर रिफीलमध्ये पंधरा दिवसांचे अंतर असावे ही अट आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना अटी आणि पात्रता काय?
– या योजनेअंतर्गत लाभ मिळवू इच्छिणाऱ्या कुटुंबातील महिलांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
– अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
– अर्जदार महिला असणे आणि ती दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
– अर्ज केलेल्या महिलेकडे आधीपासूनच एलपीजी गॅस कनेक्शन असू नये, असल्यास त्या अर्जदार महिलेला लाभ मिळणार नाही.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

‘या’ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
– जात प्रमाणपत्र
– बीपीएल एपीएल प्रमाणपत्र
– आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
– कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक
– बँक पासबुक आणि आईएफएससी कोड
– निवासी प्रमाणपत्र
– रेशन कार्ड
– पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
– अर्जदाराच्या स्वाक्षरीसह घोषणा पत्र
– उज्ज्वला कनेक्शनसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे.

Home

Leave a Comment