Petrol Diesel Price: पेट्रोल, डिझेल दरात कपात जाणून घ्या दर?

Petrol Diesel Price: पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता?

तेल विपणन कंपन्या (OMCs) आता दोन्ही इंधनांवर नफा कमावत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ शकतात, असे वृत्त ET NOWने दिले आहे. ग्राहकांसाठी दिलासा देण्यासाठी सरकारने यावर चर्चा सुरू केली आहे.

क्रूडच्या सध्याच्या किंमतींवर वित्त आणि तेल मंत्रालय चर्चा करत आहे. मंत्रालय जागतिक परिस्थिती सोबतचं OMCs च्या नफ्यावर देखील चर्चा करत आहेत.

OMC आता पेट्रोलवर 8-10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 3-4 रुपये नफा कमावत आहेत. गेल्या तिमाहीतील नफ्यामुळे OMCs चा एकूण तोटा आता कमी झाला आहे. आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तीन ओएमसींनी गेल्या तिमाहीत 28,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याने महागाई रोखण्यात सरकारला मदत होणार आहे. शिवाय केंद्र सरकारचा विश्वास आहे की क्रूडच्या किंमती प्रति बॅरल 75-80 डॉलरच्या श्रेणीत राहतील.

आजचे पेट्रोल डिझेल चे दर येथे पहा

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून कायम आहेत. मागील वर्षी 21 मे रोजी इंधनाचे दर कमी करण्यात आले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेव्हा पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केले होते.

आज चार शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 104.98 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 104.30 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.80 रुपये आणि डिझेल 94.40 रुपये प्रति लिटर

Home

Leave a Comment