शेळी मेंढी, गाई-म्हशी कुक्कुटपालन योजना सुरू येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नवनवीन माहिती जसं शेती विषयक, सरकारी योजना, शैक्षणिक, शासकीय निमशासकीय नोकरी विषयी माहिती आपल्या पर्यंत पोचवत असतो शेतकरी बांधवांनो पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाकडून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अर्ज सुरू झालेले आहेत. त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.  पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्र शासन

पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्र शासन नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
 

खालील योजनेसाठी करता येईल अर्ज

• शेळी मेंढी गटामध्ये १० शेळ्या व १ बोकड किंवा १० मेंढ्या व १ मेंढा.

• दुधाळ गाई म्हशीचे वाटप.

• ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाचा २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.

•  १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे.

• एकदिवसीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

 

गाई-म्हशी कुक्कुटपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी 
👉यावर क्लिक करा 

 

अशी असेल योजनेची प्रक्रिया

• ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

• त्यानंतर डेटा बॅकअप घेऊन प्राथमिक लाभार्थ्यांची निवड केली जाते ही प्रक्रिया चालणार आहे.

• प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करता येणार आहे.

• कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले जाणारे लाभार्थी अंतिम लाभार्थी नसतात.

• प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर जे पात्र लाभार्थी असतील त्यांना अंतिम यादी पात्रता यादी तयार करून पुढे अनुदानाचा लाभ दिला जाईल. पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्र शासन

 

गाई-म्हशी कुक्कुटपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी 
👉यावर क्लिक करा 

 

किती मिळणार अनुदान?

• एससी, एसटी तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाते.

• ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते.

कुठे करावा अर्ज

नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. मोबाईल वरून घर बसल्या अँड्रॉइड एप्लीकेशन द्वारे देखील तुम्ही अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटला अर्ज सादर करु शकता.

या योजनेच्या अटी व शर्ती

• अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.

• अर्जदाराने स्वतःच्या वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे. कारण त्यावर सद्यस्थितीचे मेसेज येत असतात.

• अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास दात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

• जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे.

• राशन कार्ड नुसार नमूद सदस्यांची नावे, संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी.

• कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.

• माहिती पूर्णतः खरी असावी माहिती अचूक व खोटी आढळून आल्यास निवड रद्द केली जाते.

गाई-म्हशी कुक्कुटपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी 
👉यावर क्लिक करा 

 

Leave a Comment