‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा मिळाला का? तात्काळ हे काम करा
Namo shetkari राज्य शासनाच्या स्वतंत्र ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा पहिला हप्ता (दि.२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा पहिला हप्ता वितरित करून शिर्डी येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेचा राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. याप्रसंगी विविध योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच अन्य नेते उपस्थित होते. namo shetkari yojana
८६ लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २ हजार रुपये पहिला हप्ता जमा
पीएम किसान योजना सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. १५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.
पीएम मुद्रा योजनेची मर्यादा वाढवली असा करा अर्ज तात्काळ दहा लाख कर्ज
१३ लाख ४५ हजार शेतकरी केंद्र, राज्याच्या योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र
पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी केवायसी विशेष मोहीम राबविल्यामुळे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्या आदेशावरुन ऑगस्टपासून ही मोहीम राबविण्यात आली होती. कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता या मोहिमेद्वारे केली होती.