खुशखबर शेतकऱ्यांना दिवसा १२तास वीज! २लाख शेतकऱ्यांना वार्षिक ५० हजार ‘महावितरण’ला मिळाली ४२९३ एकर जमीन;

Mukhyamantri saur: शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी ‘महावितरण’कडून त्यांच्या प्रत्येक सबस्टेशनला सौर पॅनल जोडण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार २९३ एकर खासगी तर साडेतीन हजार एकर शासकीय जमीन ‘महावितरण’ला मिळाली आहे.

खासगी जमिनीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे वार्षिक भाडे दिले जाणार आहे. त्यातून १४३ सबस्टेशनवरील दोन लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे.

महावितरणकडून शेतीसाठी आठ तास वीज दिली जाते, पण बहुतेकवेळा दिवसा वीजेचा लपंडाव सुरु असतो. एकूण वापरातील ४० टक्क्यांपर्यंत वीजेचा वापर शेतीसाठी होतो. शेतीपंपाची थकबाकी देखील हजारो कोटींच्या घरात आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरेशा प्रमाणात मिळत नाही.

👉जमिन भाडेतत्त्वावर देताय आधी रेकॉर्ड पहा

या पार्श्वभूमीवर आता ‘महावितरण’चे बहुतेक सबस्टेशन सोलर पॅनलला जोडले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्याठिकाणची शासकीय जमीन तर गरजेच्या ठिकाणी खासगी जमिनी भाड्याने घेतल्या जात आहेत. खासगी जमीन सोलर पॅनल उभारण्यासाठी घेताना संबंधित शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपयांचे भाडे देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.

त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ८९ शेतकऱ्यांची एक हजार २९३ एकर जमीन ‘महावितरण’ने भाड्याने घेण्याचे निश्चित केले आहे. त्या शेतकऱ्यांनीही ‘महावितरण’ला जमीन देण्यास संमती दिली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २३७ सबस्टेशनपैकी १४० सबस्टेशनवर सोलर पॅनल बसविले जाणार असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली. त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. २६) पार पडली आहे.

सबस्टेशनसाठी लागणार खासगी जमिनी

जिल्ह्यातील २३७ पैकी १०० सबस्टेशनवर सोलर पॅनल जोडण्यासाठी त्या परिसरात शासकीय जमिनीच नाहीत. त्यामुळे त्या सबस्टेशनवरील शेतकऱ्यांना दिवसा १२तास वीज पुरवठा व्हावा यासाठी खासगी जमिनी भाडेतत्त्वावर घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपयांचे वार्षिक भाडे दिले जाणार आहे. रेडिरेकनर दरानुसार दरवर्षी त्यात वाढ देखील होणार आहे. त्यामुळे ज्यांना जमिनी भाड्याने द्यायच्या आहेत, त्या शेतकऱ्यांनी ‘महावितरण’च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

👉अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती येथे पहा

१०० सबस्टेशन परिसरात हवीय जमीन

जिल्ह्यातील तीन लाख ९० हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील २३७ सबस्टेशनपैकी १४० सबस्टेशनवर सोलर पॅनल जोडण्याची कार्यवाही काही दिवसांत सुरु होईल. त्यासाठी खासगी व शासकीय जमिनी घेतल्या आहेत. आता उर्वरित जवळपास १०० सबस्टेशनसाठी जमिनी शोधल्या जात आहेत.

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment