MIDC Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) नोकरीची संधी निर्माण झाली आहे.
एमआयडीसीत ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C पदासाठी नोकर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एमआयडीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनूसार तिन्ही वर्गवारीत एकूण 802 पदांसाठी निवड प्रक्रीया राबविली जाणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ग्रुपी ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी जाहीरात दिली आहे. एमआयडीसीच्या https://www.midcindia.org/recruitment/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी. या पदासाठीची अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरु झाली आहे. तसेच उमेदवार येत्या 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.
जाहिरात पहा,अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
एमआयडीसी भरती प्रक्रीया 2023 अंतर्गत जाहीर पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. नंतर संगणकावर लॉग इन करुन उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन सादर करु शकतील. अर्ज भरताना उमेदवारांना आवश्यक एक हजार रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे. मागासवर्गीयासाठी अर्जाचे शुल्क 900 रुपये ठेवण्यात आले आहे. जाहीर केलेल्या तारखेपर्यंत शुल्क भरुन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवार जर अर्जात काही त्रुटी राहीली असेल तर एमआयडीसीद्वारे ओपन होणाऱ्या एप्लीकेशन विंडोच्या माध्यमातून दुरुस्ती करु शकतात. त्यासाठी ही एप्लीकेशन विंडो 2 ते 25 सप्टेंबरपर्यंत सुरु राहतील.
अर्ज सादर करण्यापूर्वी एमआयडीसीद्वारा विविध पदांच्या भरतीसाठी ठेवलेल्या शैक्षणिक अटी आणि नियम पूर्ण केलेले हवेत. उमेदवार भरतीसाठी दिलेल्या परिपत्रकाचे वाचन करुन शैक्षणिक अर्हता आणि इतर नियम पाहू शकता. उमेदवाराचे वय किमान 18 तर कमाल 40 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वयोगटासाठी कमाल वयात सुट देण्यात आली आहे.
अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख – 02/09/2023
अर्ज भरण्याचा अंतिम तारीख – 25/09/2023
अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख – 10/10/2023
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 02 ते 25 सप्टेंबर 2023
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 25/09/2023